Diva news : दिव्यात नवरात्र उत्सवात आरोग्य तपासणी शिबीर संपन्न

Maharashtra WebNews
0

 



दिवा, (आरती मुळीक परब) : विकास म्हात्रे येथील काळूबाई अपार्टमेंटमध्ये नवरात्र उत्सवाचे दरवर्षी आयोजन केले जाते. यंदाचे हे आठवे वर्ष असून यावर्षी त्यांनी सामाजिक उपक्रम राबवत असताना आज साई हॉस्पिटलच्या वतीने मोफत आरोग्य आणि ह्रदय रोग तपासणी शिबिराचे आयोजन केले होते. यामध्ये अपार्टमेंटमधील ६२ नागरिकांची तपासणी केली तर २२ नागरिकांची ईसीजी तपसणी केली. या आरोग्य शिबिरात मोफत वैद्यकीय सल्ला, रक्तदाब, वजन, मधुमेह, एस. पी.ओ २, इसीजी, नेत्र तपासणी आदी तपसण्या करण्यात आल्या. याचा शिबिराचा सुद्धा लाभ विकास म्हात्रे गेटमधील सर्व नागरिकांनी घेतला.

जय दुर्गा माता नवरात्र उत्सव महिला मंडळ आणि शिवतेज महिला मंडळ यांच्या प्रयत्नाने काळुबाई अपार्टमेंट २ मध्ये नवरात्र उत्सव साजरा करत असून दरवर्षी विविध सांस्कृतिक सामाजिक उपक्रम राबविले जातात. या वर्षी सुद्धा त्यांनी लहान मुलांसाठी वेशभूषा स्पर्धा, डांन्सच्या स्पर्धा, चमचा गोटी, चित्रकला स्पर्धा, संगीत खुर्ची स्पर्धा, तर समस्त महिलांसाठी पैठणी आणि संगीत खुर्ची स्पर्धा ठेवण्यात आली होती. या सर्व स्पर्धांमध्ये लहान थोर अशा सर्वांनी उत्साहाने सहभागी झाले होते. या सर्व कामासाठी मंडळाच्या कार्याध्यक्ष शर्मिला अजय म्हात्रे, अजय म्हात्रे, मनाली उगवे, अनिता दळवी, ज्योती दळवी, सायली होडे, गीता रसाळ, रोहिणी शेलार, मंजू पारधी, सुनिता भट, मानसी सिबे, मयुरी खाके, मेघना पारावे, सविता हरारे यांच्या मार्गदर्शना खाली मंडळाच्या कार्यकर्त्यांनी विशेष मेहनत घेतली.


Post a Comment

0Comments

Post a Comment (0)