Kalyan news : कल्याण पूर्व विधानसभा मतदारसंघातून प्रल्हाद जाधव इच्छुक

Maharashtra WebNews
0

  




राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांची घेतली भेट 


डोंबिवली  ( शंकर जाधव ) : आगामी विधानसभा निवडणुकीत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाने मतदारांचा पाठींबा घेत निवडणूकित उमेदवारी मिळविण्याची इच्छा व्यक्त केली. कल्याण पूर्व विधानसभा मतदारसंघातून रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाकडून प्रल्हाद जाधव यांनी उमेदवारीसाठी इच्छा व्यक्त केली आहे. येथील मतदारसंघातील नागरीकांच्या समस्या सोडविल्या असून नागरिकांशी दांडगा संपर्क असल्याचेही जाधव यांनी सांगितले.


याबाबत प्रल्हाद जाधव म्हणाले, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ( आठवले गट ) राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांनी कल्याण येथील विधानसभा मतदार संघात रिपाईचा उमेदवार असावा अशी इच्छा महायुतीकडे व्यक्त केली आहे. कल्याण पूर्व मतदार संघातील झोपडपट्टीतील नागरिकांना पाणी समस्या सोडविण्यास मी शासनाकडे केलेल्या पाठपुराव्याला यश आले आहे. 


कल्याण लोकसभा मतदार क्षेत्रात झोपडवासीयांच्या समस्या सोडवण्यासाठी वेळोवेळी रिपाई माध्यमातून पालिका प्रशासनाकडे पत्रव्यवहार करून त्या समस्या निकालात काढल्या. रेल्वे व पालिका प्रशासनाच्या कारवाईमुळे मोठ्या प्रमाणावर झोपडपट्टी नागरिकांवर बेघर होण्याची वेळ आली होती त्यांना अशा संकटातून बाहेर काढले. मुख्य म्हणजे ज्या विधानसभा मतदारसंघात मोठ्या संख्येने आमचे हक्काचे मतदार आहेत त्या विधानसभा मतदारसंघातून आपणच निवडणूक लढवावी अशी आपल्या लोकांची इच्छा आहे अशी मागणी आपलेच मतदार करीत आहेत असे जाधव सांगतात. 


परिणामी कल्याण पूर्व विधानसभा मतदार संघातून विधानसभा निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक उमेदवारांची संख्या दिवसेंदिवस वाढत जात असल्याचे चित्र समोर येत आहे. यामुळे आता महायुतीतून रिपाई आठवले गटाच्या इच्छुक उमेदवार कल्याण पूर्व कामाला लागल्याचे दिसून येत आहे. यामुळे कल्याण पूर्व मतदारसंघात मैत्रीपूर्ण लढतीचे वारे घोंघावणार का अशी चर्चा आहे.

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)