महानगरपालिकेची धडक कारवाई !
कल्याण, ( शंकर जाधव) : कल्याण - डोंबिवली महानगरपालिका २/ब प्रभाग क्षेत्रातील मौजे- चिकणघर येथील रोशन पेट्रोल पंप (मिळकत क्रमांक. B०२००२४३२९००) यांची आजमितीस रु.९५,१४,३०९/- इतकी थकीत रक्कम होती. सदर रक्कम वसुली होणेच्या दृष्टीने संबंधित मिळकतधारकास यापूर्वी महानगरपालिकेच्या कर विभागामार्फत नोटीस बजाविण्यात आली होती. तथापी, संबंधित मिळकतधारकांनी वेळोवेळी सुचना देवूनही थकीत मालमत्ता कराचा संपुर्ण भरणा न केल्यामुळे सदर थकीत रक्कम वसुल करणेच्या दृष्टीने महानगरपालिका आयुक्त डॉ. इंदु राणी जाखड यांचे निर्देशानुसार २/ब प्रभागाच्या सहाय्यक आयुक्त सोनम देशमुख, कर विभागाच्या सहाय्यक आयुक्त स्नेहा करपे व कर अधिक्षक-प्रमोद पाटील यांच्या पथकाने सोमवारी रोशन पेट्रोल पंप कार्यालय सील करण्याची धडक कारवाई केली.
मालमत्ता कर हा महापालिका उत्पन्नाचा प्रमुख स्त्रोत आहे. करदात्यांनी आपला कर विहित मुदतीत जमा करुन, अशी अप्रिय कटू कारवाई टाळावी व महानगरपालिकेस सहकार्य करावे असे आवाहन मालमत्ता कर विभागाकडून करण्यात येत आहे.