No fireworks delhi : नवी दिल्लीत फाटाक्यावर बंदी

Maharashtra WebNews
0

 



नवी दिल्ली : राजधानीतील वाढत्या प्रदूषणाच्या पार्श्वभूमीवर दिल्ली सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. हिवाळ्यात वाढते प्रदूषण लक्षात घेता दिल्लीच्या आप सरकारने १४ ऑक्टोबरपासून ते १ जानेवारीपर्यंत फटाक्यांचे उत्पादन, साठवणूक, विक्री आणि वापरावर बंदी घालण्यात आली आहे. दिल्ली सरकारनेही बंदीबाबत सूचना जारी केल्या आहेत त्याचबरोबर दिल्लीतील जनतेने सहकार्य करण्याचे आवाहनही त्यांनी केले आहे. 


 हिवाळा सुरू होण्यापूर्वीच दिल्लीत प्रदूषण वाढू लागले आहे. दसऱ्यानंतर एनसीआरमध्ये प्रदूषणाची पातळी वाढली, दिल्ली आणि एनसीआरमधील बहुतांश प्रमुख शहरांमध्ये हवेचा दर्जा निर्देशांक २०० ने ओलांडला. त्यामुळे हवेची गुणवत्ता दूषित झाल्याचे म्हटले आहे.


दिल्ली सरकारचे मंत्री गोपाल राय यांनी दिल्लीतील जनतेला कडक इशारा दिला आहे. बांधकाम किंवा अन्य कोणत्याही माध्यमातून धुळीचे प्रदूषण पसरविणाऱ्यांविरोधात सोमवारपासून अधिक तीव्र मोहीम करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. कोणालाही शिथिल केले जाणार नाही आणि नियमांचे पालन न करणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाईल, असेही ते म्हणाले. धूळ विरोधी मोहिमेअंतर्गत लोकांवर कडक कारवाई केली जाईल. 

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)