डोंबिवली ( शंकर जाधव ) : कल्याण ग्रामीण विधानसभा मतदारसंघांचे शिवसेना आमदार राजेश मोरे यांच्या जनसंपर्क प्रतिनिधीकडून वाहन अपघातग्रस्त श्वानावर तातडीने वैद्यकीय उपचार मिळाले.
मुक्या जनावरांना वैद्यकीय मदत मिळाल्याने नागरिक व श्वानप्रेमींनी आमदार मोरे यांचे आभार मानले.समाज सेवेसोबत पशु सेवा ही सुद्धा ईश्वर सेवा आहे असा सल्ला देणारे आमदार राजेश मोरे यांचे समर्थक म्हणून ओळखले जाणारे वैभव विलास राणे यांनी राजेश मोरे यांच्या सल्यानुसार समाजसेवा सुरु केली. एक श्वान जखमी दिसताच राणे यांच्यासह काही शिवसैनिकांनी वैद्यकीय मदत दिली.