Kolhapur crime : घरफोडीचा सराईत गुन्हेगार अटकेत

Maharashtra WebNews
0




एकूण ४,१६,५००/- रुपये किमतीचे ५९.५०० ग्रॅम सोन्याचे दागिने जप्त


कोल्हापूर, ( शेखर धोंगडे ) : कोल्हापूर जिल्ह्यात होत असलेल्या घरफोडी चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्याच्या दृष्टीने स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर तसेच दुय्यम अधिकारी यांना जिल्ह्यातील मालाविरुध्दचे गुन्ह्यांचा समांतर तपास करून गुन्हे उघडकीस आणण्याच्या सूचना दिल्या होत्या. 



सूचनांप्रमाणे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा, कोल्हापूरचे पोलीस उपनिरीक्षक शेष मोरे व इतर पोलीस अंमलदार यांचे तपास पथक तयार करून तपास सुरू केला. सदर पथकामार्फत तांत्रिकदृष्ट्या तपास करून व गोपनीयरित्या माहिती मिळवून घरफोडी चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्याचे प्रयत्न सुरू असताना पोलीस अंमलदार महेश खोत यांना गोपनीय माहिती मिळाली की, शहापूर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्यातील एक आरोपी अस्लम सनदी हा चोरीचे सोन्याचे दागिन्यांची  विक्री करण्यासाठी टोप येथील दुर्गीमाता हॉटेल जवळ येणार आहे. मिळालेल्या माहितीच्या अनुषंगाने तपास पथकाने दुर्गामाता हॉटेल, टोप गावचे हद्दीमध्ये तालुका- हातकणंगले येथे सापळा रचून आरोपी  अस्लम मेहबुब सनवी (३३) यास ताब्यात घेतले. त्याची झडती घेतली असता त्याच्याजवळ चोरी केलेले सोन्याचे दागिने आढळून आले. सदर दागिन्यांबाबत तपास केला असता ते चोरीचे असल्याचे स्पष्ट झाले. याप्रकरणी आरोपीकडून ४,१६,५००/- रुपये किमतीचे ५९.५०० ग्रॅम सोन्याचे दागिने जप्त केले.


अधिक तपास केला असता, आरोपी अस्लम सनदी याच्यावर यापूर्वी कर्नाटक राज्यामध्ये ११ घरफोडीचे गुन्हे दाखल असून महाराष्ट्र राज्यामध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील आजरा पोलीस ठाणे येथे १ गडहिंग्लज पोलीस ठाणे येथे -१, जयसिंगपुर पोलीस ठाणे येथे १ व शहापुर पोलीस ठाणे येथे २ असे ६ घरफोडी गुन्हे दाखल असून सांगली जिल्ह्यामध्ये एकूण १८ घरफोडीचे गुन्हे दाखल असल्याचे समोर आले. 



 सदरची कारवाई पोलीस अधीक्षक,  महेंद्र पंडित सस्रो, अप्पर पोलीस अधीक्षक सो गडहिंग्लज कॅम्प इचलकरंजी निकेश खाटमोडे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर, पोलीस उप-निरीक्षक शेष मोरे, पोलीस उप-निरीक्षक आतिष म्हेत्रे पोलीस अंमलदार महेश खोत, संतीश जंगम, संजय कुंभार, महेश पाटील, प्रदीप पाटील, यशवंत कुंभार, सुहास पाटील, सचिन बेंडखळे यांनी केली आहे.







Post a Comment

0Comments

Post a Comment (0)