५ जानेवारीपर्यंत ॲपल उत्पादनांवर मिळणार आकर्षक सवलती
मुंबई, : भारतातील प्रीमियर इलेक्ट्रॉनिक्स ओम्नी-चॅनल रिटेल चेन विजय सेल्सने ॲपल डेज सेलची घोषणा केली आहे. हा सेल ५ जानेवारी २०२५ पर्यंत त्यांच्या १४०+ रिटेल आउटलेट आणि ऑनलाइन वेबसाइटवर उपलब्ध असेल. या सेलमध्ये ग्राहकांना आयफोन्स, मॅकबुक्स, आयपॅड्स, घड्याळे, एअरपॉड्स आदी ॲपलची प्रीमियम उत्पादने आकर्षक किंमतीत विविध सवलतींसह खरेदी करण्याची सुविधा मिळेल.
विजय सेल्सचे संचालक नीलेश गुप्ता यांनी सांगितले की, “ॲपल डेज सेल हा अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा आणि अविश्वसनीय मूल्याचा उत्सव असून पुन्हा एकदा याची घोषणा करताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे. आकर्षक डील आणि एक्सचेंज बोनससह ॲपल प्रेमी लोकांसाठी त्यांचे डिव्हाइस अपग्रेड करण्याची आणि नवीन वर्षाची शानदार सुरुवात करण्याची ही उत्तम संधी आहे."
या सेलच्या माध्यमातून ॲपल उपकरणे अविश्वसनीय मूल्यासह अपग्रेड करण्याची उत्तम संधी आहे आणि वर तुम्ही इन्स्टंट बँक डिस्काउंट आणि आकर्षक कॅशबॅक अशा खास ऑफरचा आनंद घेऊ शकता. तुम्ही अत्याधुनिक आयफोन १६ प्रो किंवा पॉवरहाऊस आयफोन १६ प्रो मॅक्स अनुभवण्याची वाट पाहत असाल तर योग्य संधी आली आहे. तसेच पूर्वीचे मॉडेल एक्सप्लोर करू इच्छिणाऱ्यांसाठी, आयफोन १५ मालिका आणि आयफोन १३ मालिका देखील अत्यंत आकर्षक किमतीत उपलब्ध आहेत. ही मॉडेल्स अपवादात्मक कामगिरी करत राहतात आणि अपग्रेड करण्यासाठी किंवा भेटवस्तू देण्यासाठी आदर्श आहेत.
*ॲपल डेज सेलमधील आकर्षक सवलती:*
● लेटेस्ट आयफोन १६ मिळवा ६६,९०० रुपयांच्या खास प्रारंभिक किमतीत, आयफोन १६ प्लसची सुरुवात ७५,४९० रुपयांपासून पासून होते. या किमतींमध्ये आयसीआयसीआय, एसबीआय आणि कोटक महिंद्रा बँक कार्ड्सवरील ४,००० रुपयांचे इन्स्टंट डिस्काउंट समाविष्ट आहे.
● शक्तिशाली आयफोन १६ प्रो १,०३,९०० रुपये आणि आयफोन १६ प्रो मॅक्स १,२७,६५० अशा प्रारंभिक किमतीत उपलब्ध असतील. या किमतींमध्ये आयसीआयसीआय, एसबीआय आणि कोटक महिंद्रा बँक कार्ड्सवरील ३,००० रुपयांचे इन्स्टंट डिस्काउंट समाविष्ट आहे.
● आयफोन १५ रुपये ५७,४९० च्या प्रारंभिक किमतीत उपलब्ध असेल. आयफोन १५ प्लस रुपये ६६,३०० पासून सुरू होतो. या किमतींमध्ये आयसीआयसीआय, एसबीआय आणि कोटक महिंद्रा बँक कार्ड्सवरील ३,००० रुपयांचे इन्स्टंट डिस्काउंट समाविष्ट आहे.
● आयफोन १४ हा ४८,९०० रुपयांच्या प्रारंभिक किमतीत उपलब्ध असेल. या किमतीमध्ये आयसीआयसीआय, एसबीआय आणि कोटक महिंद्रा बँक कार्ड्सवरील १,००० रुपयांचे इन्स्टंट डिस्काउंट समाविष्ट आहे.
● आयफोन १३ रुपये ४२,९०० च्या प्रारंभिक किमतीत उपलब्ध असेल. या आयसीआयसीआय, एसबीआय आणि कोटक महिंद्रा बँक कार्ड्सवरील १,००० रुपयांचे इन्स्टंट डिस्काउंट समाविष्ट आहे.
● आयपॅड १० जनरेशन २९४९९ रुपयांच्या प्रारंभिक किमतीत उपलब्ध असेल; आयपॅड एअर एम२ चिपसह रुपये ५०४९९, तर आयपॅड प्रो एम४ चिपसह रुपये ८६,८९९ पासून सुरू होतात. या किमतींमध्ये आयसीआयसीआय, एसबीआय आणि कोटक महिंद्रा बँक कार्ड्सवरील ४,००० रुपयांचे इन्स्टंट डिस्काउंट समाविष्ट आहे.
● १३-इंच आणि १५-इंच आकारात उपलब्ध असलेल्या मॅकबुक एअर लाइनअपसह आपल्या उत्पादकतेत भर घाला. एम१ चिपसह मॅकबुक एअर ६३,८९० रुपयांपासून आणि एम२ चिपसह ७९,८९० रुपयांपासून सुरू होतात. ९३,३९० रुपयांपासून सुरू होणाऱ्या एम३ चिपसह अत्याधुनिक गतीची निवड करा. या किमातींमध्ये आयसीआयसीआय, एसबीआय आणि कोटक महिंद्रा बँक कार्ड्सवरील १०,००० रुपयांपर्यंत इन्स्टंट डिस्काउंट समाविष्ट आहे.
● १५-इंच आणि १६-इंच मॉडेलमध्ये उपलब्ध असलेल्या मॅकबुक प्रो मालिकेसह नावीन्यपूर्ण अनुभव घ्या. एम४ चिपसह मॅकबुक प्रो ची सुरुवात १,४७,९०० रुपयांपासून होते. १,७४,९०० रुपयांपासून एम४4 प्रो चिपला अपग्रेड करता येईल. या किमतींमध्ये आयसीआयसीआय, एसबीआय आणि कोटक महिंद्रा बँक कार्ड्सवरील ५,००० रुपयांपर्यंत इन्स्टंट डिस्काउंट समाविष्ट आहे.
● लेटेस्ट ॲपल वॉच सिरीज १० ४१,०९९ रुपयांपासून उपलब्ध होईल, तर ॲपल वॉच एसई (सेकंड जनरेशन) २१,१९९ रुपयांपासून सुरू होते. ॲपल वॉच अल्ट्रा २ देखील रुपये ७९,५९९ च्या प्रारंभिक किमतीत उपलब्ध आहे. या किमतींमध्ये आयसीआयसीआय, एसबीआय आणि कोटक महिंद्रा बँक कार्ड्सवरील ४,००० रुपयांपर्यंत इन्स्टंट डिस्काउंट समाविष्ट आहे.
● वापरकर्ते लेटेस्ट एअरपॉडस ४ फक्त ११,२४९ मध्ये खरेदी करू शकतात तर एएनसी वैशिष्ट्यासह एअरपॉडस ४ रुपये १६,४०० ला उपलब्ध आहे. एअरपॉडस प्रो (सेकंड जनरेशन) २१,४९० रुपयांच्या आकर्षक किंमतीला खरेदी करता येईल. या किमतींमध्ये आयसीआयसीआय, एसबीआय आणि कोटक महिंद्रा बँक कार्ड्सवरील २,००० रुपयांपर्यंत इन्स्टंट डिस्काउंट समाविष्ट आहे.
·● बीट्स ऑडिओसह ऑडिओ एक्सलन्स ४,२९० रुपयांपासून सुरू होते, या किमतींमध्ये आयसीआयसीआय, एसबीआय आणि कोटक महिंद्रा बँक कार्ड्सवरील १,५०० रुपयांपर्यंत इन्स्टंट डिस्काउंट समाविष्ट आहे.