दिव्यात महात्मा जोतिबा फुले जन आरोग्य योजनेचे मोफत कार्ड वितरण

 




दिवा शहर शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा उपक्रम

दिवा, (आरती परब) :  शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे, दिवा शहर आयोजित महात्मा जोतिबा फुले जन आरोग्य योजनेचे मोफत शिबिराचे आयोजन शहर प्रमुख सचिन पाटील, नगरसेविका अंकिता पाटील, युवासेना शहर अधिकारी अभिषेक ठाकुर, विभाग संघटीका मयुरी पोरजी यांच्या मार्फत साबे चौक येथे करण्यात आले. तरी त्या शिबिराचा पहिल्याच दिवशी २१० नागरिकांनी लाभ घेतला.‌ 


या कार्यक्रमाला उपशहरप्रमुख तेजस पोरजी, विधानसभा संघटीका योगिता नाईक, शहर संघटीका ज्योती पाटील, शहर समन्वयक प्रियांका सावंत, उपशहर संघटीका स्मिता जाधव, तृप्ती पाटील, उप शाखा प्रमुख श्रावणी कदम तसेच त्यावेळी विभाग प्रमुख, शाखा प्रमुख व सर्व पदाधिकारी शिवसैनिक उपस्थित होते. 


या शिबिराचा लाभ ३० डिसेंबरपर्यंत घेता येईल, अशी माहिती शहर प्रमुख सचिन पाटील यांनी दिली. तरी या योजनेचा लाभ दिवेकर नागरिकांनी जास्तीत जास्त घ्यावा, असे आवाहन शहर प्रमुख सचिन पाटील यांनी केले.



Post a Comment

Previous Post Next Post