मेडिकल दुकान बंद करण्याची पोलिसांची सक्ती

 


 


डोंबिवली केमिस्ट असोसिएशनचा आरोप 

डोंबिवली ( शंकर जाधव ) :  अत्यावश्यक सेवा असलेल्या मेडिकल दुकान २४ तास चालू असतात. मात्र रात्रीच्या वेळी मेडिकल दुकानात आईस्क्रिम विकत असल्याचे कारण देत मेडिकल दुकान रात्री साडे दहा वाजता बंद करण्याची सक्ती पोलीस करत असल्याचा आरोप डोंबिवली केमिस्ट असोसिएशनने केला आहे. याचा जाब विचारण्याकरता असोसिएशन सोमवारी डोंबिवली रामनगर पोलीस ठाण्यात निवेदन देणार आहेत. यावेळी कल्याण ग्रामीण विधानसभा मतदारसंघातील शिवसेना आमदार राजेश मोरे, अखिल भारतीय संघटनेचे अध्यक्ष जगन्नाथ शिंदे यांची देखील उपस्थिती  आहे.


डोंबिवली पूर्वेकडील शिव मंदिर रोडवरील एका मेडिकल  दुकानाच्याआत जाऊन  दुकान मालकाला बाहेर काढत  पोलीस स्टेशनमध्ये नेण्यात आले. रात्री १०.३० नंतर दुकान का सुरू ठेवले अशी कारणे पोलिसांकडून दिली जात आहे. संबंधित अधिकारी यांच्यावर कारवाई झाली नाही तर दुकान बंद आंदोलन करण्याचा इशारा निलेश वाणी चेअरमन, अध्यक्ष दिलीप देशमुख, सचिव संजू भोळे, खजिनदार रेवा गोमतीवाल यांनी दिला. डोंबिवली शहरातील सर्व मेडिकल दुकानदारांनी या अन्याय विरोधात विरोध  करण्यासाठी सोमवारी सकाळी ११.३० वाजता उपस्थित राहण्याचे आवाहन डोंबिवली मेडिकल केमिस्ट वेल्फेअर असोसिएशनकडून करण्यात आले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post