South Korean plane crash : दक्षिण कोरियात लँडिंगदरम्यान विमानाचा अपघात

Maharashtra WebNews
0

 आतापर्यंत १२७ जणांचा मृत्यू झाल्याची पुष्टी




मुआन: दक्षिण कोरियात रविवारी जेजू एअरचे विमान बँकॉक, थायलंड येथून दक्षिण कोरियाच्या मुआन येथे परतत असताना अपघात झाला. आतापर्यंत १२७ जणांचा मृत्यू झाल्याची पुष्टी झाली आहे तर या अपघातात १७९ लोकांचा मृत्यू झाल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. या विमानात १७५ प्रवाशांसह ६ क्रू मेंबर्स असे मिळून १७९ जण प्रवास करत असल्याची माहिती प्राप्त झाली आहे. 


जेजू एअरचे विमान ७३७-८००  बँकॉक, थायलंड येथून दक्षिण कोरियाच्या मुआन येथील विमानतळावर उतरत असताना विमान धावपट्टीवर घसरले आणि कुंपणाला धडकले. या धडकेमुळे विमानाने अचानक पेट घेतला. अपघाताच्या वेळी विमानात १७५ प्रवासी आणि ६ क्रू मेंबर्स होते. अहवालानुसार, या दुर्घटनेत १७९ लोकांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त करण्यात येत असून, केवळ २ जणांचा जीव वाचण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हे दोन लोक क्रू मेंबर्स आहेत, जे कसेतरी वाचले. आतापर्यंत १२७ जणांचा मृत्यू झाल्याची पुष्टी झाली आहे, मात्र मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे.



प्राथमिक तपासानुसार, बँकॉकहून मुएनला परतणारे जेजू एअर बोईंग ७३७-८०० पक्ष्यांच्या धडकेमुळे क्रॅश झाले. पक्ष्याच्या धडकेमुळे विमानाचे लँडिंग गियर खराब झाल्याचे सांगण्यात येत आहे. मुआन आंतरराष्ट्रीय विमानतळावर हा अपघात झाला. रिपोर्टनुसार, विमान अपघातापूर्वी एका प्रवाशाने कुटुंबातील सदस्याला संदेश पाठवला की, फ्लाइटच्या पंखाला पक्षी आदळला आणि त्यात अडकल्याची माहिती दिली. 




Post a Comment

0Comments

Post a Comment (0)