डोंबिवलीत वाहतूक नियम मोडणाऱ्या वाहनचालकांवर कारवाई

 



डोंबिवली ( शंकर जाधव ) :वाहतुकीचे नियम हे वाहनचालक व नागरिकांच्या सुरक्षितेकरता बनविले आहेत.मात्र अनेक वाहनचालक नियमांचे पालन करत नसल्याने ते स्वतःबरोबर इतरांचाही जीव धोक्यात घालत असतात. तसे होऊ नये याकरिता अशा वाहनचालकांवर कारवाई केली जाते. डोंबिवलीत नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांवर वाहतूक नियंत्रण शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीराम पाटील व वाहतूक पोलीस कारवाई करतं आहेत.




डोंबिवलीतील मुख्य रस्त्यावर वाहतूक पोलिसांची वाहनचालकांवर होत असलेली कारवाई पाहून काही रिक्षाचालकांनी तेथून पळ काढला. तर दुचाकी व चारचाकी वाहनांनी नियमांचे पालन केले. ३१ डिसेंबरच्या निमित्ताने तळीराम दारू पिऊन वाहन चालवू नये याकरिता वाहतूक पोलीस तपासणी करत आहेत. काही रिक्षाचालकांनी हेडलाईड चुकीच्या पद्धतीने लावण्याने समोरील वाहचालक अथवा रस्ता ओलाडणाऱ्या नागरिकांचा अपघात होऊ शकतो. अशा हेडलाईट लावणाऱ्या रिक्षाचालकांवरही कारवाई करण्यात आली.




Post a Comment

Previous Post Next Post