न्यू फोर्स अकॅडमीच्या माध्यमातून तरुणांची स्वप्नपूर्ती

Maharashtra WebNews
0


डोंबिवली ( शंकर जाधव ) :.डोंबिवलीकरांच्या मनात देशभक्ती ही असते. इथल्या लहान मुलांवर देशभक्तीचे संस्कार केले जातात. त्यातूनच ही मुलं पुढे जाऊन वर्दीत राहून करियर घडावे, हे स्वप्न उराशी बाळगू लागतात. डोंबिवली आणि आसपासच्या परिसरातील तरुण-तरुणींचे हे स्वप्न पूर्ण व्हावे, हा आपल्या डोंबिवलीकर न्यू फोर्स अकॅडमीच्या स्थापनेमागचा उद्देश सफल होताना बघून समाधान मिळत आहे.



 या अकॅडमीची विद्यार्थिनी तेजस्विनी पाटील हिची लातूर येथील अग्निशामक दलामध्ये, तर सोनी माधव भुरे हिची ठाणे शहर पोलीस दलात तसेच रितेश तायडे या प्रशिक्षणार्थ्याची CRPF मध्ये निवड करण्यात आली आहे. आता आपल्या अकॅडमीचे हे विद्यार्थी कर्तव्यावर रुजू झाले असून त्यांच्या हातून देशसेवेसारखे महत्त्वाचे कार्य घडत आहे. 


सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी डोंबिवलीकर न्यू फोर्स अकॅडमीला भेट देत  या सर्व नवनियुक्त अधिकाऱ्यांचा गौरवपर सत्कार केला. तसेच पुढील वाटचालीसाठी सर्वांना शुभेच्छा दिल्या.




Post a Comment

0Comments

Post a Comment (0)