विलेपार्लेच्या स्केटिंगपटूंची आंतरराष्ट्रीय स्तरावर दिमाखदार कामगिरी

Maharashtra WebNews
0

 


मुंबई / नारायण सावंत : प्रबोधनकार ठाकरे क्रिडा संकुलाच्या स्केटिंग खेळाडूंचा आंतरराष्ट्रीय पातळीवर दबदबा दिसून आला आहे. दक्षिण कोरियात नुकत्याच पार पडलेल्या २०व्या एशियन रोलर स्केटिंग चॅम्पियनशिप २०२५ मध्ये विलेपार्ले येथील प्रबोधनकार ठाकरे क्रिडा संकुल (PTKS) मधील खेळाडूंनी अपूर्व यश मिळवत भारत आणि महाराष्ट्राचे नाव आंतरराष्ट्रीय स्तरावर उज्ज्वल केले आहे.



 या स्पर्धेत खेळाडूंनी दोन सुवर्ण आणि एक रजत पदक पटकावत देशाचा गौरव केला. वयोगट १४–१७ मध्ये मुलींच्या सोलो डान्स प्रकारात नायशा निशित मेहता हिने सुवर्ण पदक पटकावले, तर वयोगट ११–१४ मध्ये रिधम हर्षल ममाणिया हिनेही मुलींच्या सोलो डान्स प्रकारात सुवर्ण पदक मिळवले. याशिवाय कॅरोलिन फर्नांडिस हिने रोलर डर्बी प्रकारात रजत पदक पटकावत आपली चमक दाखवली.



 या सर्व खेळाडूंनी आंतरराष्ट्रीय दर्जाची कामगिरी बजावली असून, त्यांच्याकडे सुवर्ण पदक जिंकण्याची जबरदस्त क्षमता असल्याचे मत संकुलाचे अध्यक्ष अरविंद रमेश प्रभू यांनी व्यक्त केले. लवकरच या खेळाडूंची भारतीय संघासाठी निवड होईल, असा ठाम विश्वासही त्यांनी व्यक्त केला. या उल्लेखनीय यशामागे संकुलाचे अध्यक्ष  अरविंद रमेश प्रभू, सचिव डॉ. मोहन अनंत राणे, Skating Association of Maharashtra चे अध्यक्ष पुष्पेंद्र कुमार सिंह, प्रशिक्षक व आंतरराष्ट्रीय पंच आदेश सिंग आणि कोरिओग्राफर मोनिश कुमार कोटियन यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले आहे. या विजयामुळे संपूर्ण महाराष्ट्रात आनंदाचे वातावरण असून, स्केटिंगसारख्या खेळातील नव्या पिढीला यामुळे प्रेरणा मिळेल.

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)